"प्राणी एकमेकांशी कसे बोलतात?*_
माणसाप्रमाणे प्राणीसुद्धा त्यांच्या विशिष्ट भाषेत आणि वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांशी बोलत असतात...
▪ आपण काही सांगताना आपल्या चेहर्यावरील भाव बदलतो किंवा हातवारे करून सांगतो. त्याचप्रकारे प्राणी विशिष्ट आवाज काढून किंवा खुणांद्वारे एकमेकांशी बोलतात...
▪ प्राणी स्वत:चे संरक्षण करण्यासाठीही वेगवेगळे आवाज काढतात. उदा. इतर प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी माकड हा प्राणी जोरजोरात ओरडतो. यामुळे इतर माकडांना कळते की, ते माकड संकटात आहे. केवळ आवाजानेच नाही तर माकड गंधानेही एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच ते आपले घरही गंधानेच ओळखतात.
▪ प्राणी एकमेकांशी बोलण्यासाठी नेत्रपल्लवीचाही वापर करतात. त्यामुळे प्राणीसुद्धा एकमेकांशी बोलतात, असं म्हणायला हरकत नाही…
Comments
Post a Comment