उच्च रक्तचाप (हाय ब्लडप्रेशर)
१) खसखस आणि टरबुजाची बियांचा गर वेग वेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तचाप कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते.
२) एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर) उच्च रक्तचाप कमी होतो.
३) मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.
४) फांदीवर पिकलेली पपई तीस दिवस सकाळी रिकाम्यापोटी खावे, त्यानंतर २ तास काही खाऊ पिऊ नये.
५) गहू व चणे समप्रमाणात घेऊन दळून घावे, या पीठ च्या पोळ्या खाव्या. एका आठवठ्यात आराम येतो.
६) रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी प्यावे. त्याने उच्च रक्तचाप सामान्य होतो.
७) तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावी. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तचापात आराम येतो.
Comments
Post a Comment