Skip to main content

#देव..

" गाडगे महाराज यांची सुंदर कविता "
          *" देव "*

         कीती पुजला देव तरी,
         देव अजुन पावला नाही...
         कुठं राहतो कुणांस ठाऊक,
         अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||
मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,            
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक      अजुनपर्यंत घावला नाही...||१||

          सगळं काही तोच देतो,
          तोच पुरवतो सगळ्यांची हौस.
          शेतक़री बघतो आभाळांकडं,
          मग गेला कुठं पाऊस...
          खुप केलं हरी हरी तरी,
          मुखांत कधी मावला नाही...
          कुठं राहतो कुणांस ठाऊक,
         अजुनपर्यंत घावला नाही...||२||

कधी स्वत: राहून उपाशी,                            भुक त्याची भागवली...
  हा म्हणे नैवद्यावर थोडी,
  साखर का नाही मागवली...
  आहार त्याचा वाढतं गेला,
  कधी एका बक-यावर भागला नाही...
  कुठं राहतो कुणांस ठाऊक,
  अजुनपर्यंत घावला नाही...||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||
                                                                                 *संत गाडगे महाराज*

Comments

  1. कविता गाडगे महाराजांची आहे की नरेंद्र दाभोळकर यांची?

    ReplyDelete
  2. गाडगे महाराजांची. दाभोळकरांनी कवितेला खाली एक विजोड ठिगळ (५ वे कडवे ) लावले होते. काही ठिकाणी संपूर्ण कविता त्या ठिगळासकट त्यांच्या नावावर खपवतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...