#कवली
लहापणीची एक छान आठवण, भातशेती कापणीच्या वेळी खास लहान मुलांसाठी बांधली जाणारी छोटी मोळी (भारा) म्हणजेच कवली.
शेतावरून घरी जाताना दुपारचे जेवण/संध्याकाळचा चहा घेऊन गेलेल्या लहान मुलांच्या डोक्यावर दिली जायची. तीच पेंडकी घरी घेऊन आल्यावर त्याच्यातील कणसं पायाने मळून निघालेला भात दुकानात विकल्यावर पैसे मिळायचे. स्वतःच्या घरी, मामाकडे, काकाकडे असे तीन चार वेळा शेतावर पेंडक्या मिळाल्या कि आलेल्या पैशांतून छोटी का होईना दिवाळी साजरी केली जायची.
Comments
Post a Comment