Skip to main content

#आता मी पाहुणी आहे...


*आता मी पाहुणी आहे*....

मंगळसुत्र आणि जोडवे
या सगळ्यांमुळे नाही..
तर भरलेल्या बॅगमुळे
परके वाटते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आई म्हणते अगं
हे बॅगमध्ये लगेच भर
नाहीतर जाताना विसरशील,
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

माहेरी येण्याआधीच
परत जाण्याच्या बसचे
तिकीट बुक असते,
किती जरी सुट्टी असली
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून
वाईट वाटते,
मन आतल्या आंत रडू लागते..
मग जबाबदारीची जाणीव होऊन
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

माझ्या माहेरच्या खोलीचा
कोपरा अनं कोपरा
फक्त माझा आणि
मी म्हणेल तसा असायचा
पण आता पंखा आणि
दिवा लावताना सुद्धा
बटणाचा गोंधळ उडतो..
प्रत्येक क्षण आता
मी पाहुणी आहे
हे जाणवुन देतो..

आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे
आणि गच्च भरलेली 
बसमध्ये बसावे लागते,
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..

आता मी पाहुणी आहे
हे प्रत्येक क्षणी जाणवते..        
                
Dedicated to all women's
====================
Why married daughters come to visit their parents ?

Very nice must read.

👰🌹मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला 🌹👰

💠 मुली येतात माहेरी
आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला....🌾🌾

💠  त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला.... 👬
त्या येतात आपलं लहानपण शोधायला....

💠 त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला....
कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला....🏠

💠 त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला....
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला....💚
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली जेव्हा परत जातात सासरी....
बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी....
तीचे गोड हसणें आठवले कि नकळत....
सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी....😪

💠 जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला....
खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

♻ खूप चंचल, खूप आनंद देणाऱ्या असतात ह्या मुली....
♻ नाजूक मनाच्या आणि भोळ्या असतात ह्या मुली....
♻ छोट्या - छोट्या गोष्टी वर रडणाऱ्या....
♻ खूप निष्पाप असतात ह्या मुली....
♻ प्रेम वात्सल्य भरभरून असणाऱ्या देवाची देणगी असतात ह्या मुली....
♻ घर कसं प्रफुल्लीत होतं, जेव्हा हसतात ह्या मुली....
♻ काळजाचं पाणी होतं तेव्हा....
♻ लग्न होऊन जेव्हा दुसऱ्या घरी जातात ह्या मुली....
♻ खूप एकटं - एकटं वाटतं किती रडवुन जातात ह्या मुली....
♻ आनंदाच प्रतीक आई बाबांच्या खूप लाडक्या असतात ह्या मुली....
♻ हे मी नाही म्हणत....
♻ हे तर साक्षात देव म्हणतो कि....
♻ मी जेव्हा खूप प्रसन्न असतो तेव्हा जन्म घेतात ह्या मुली....

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...