Skip to main content

#निसर्ग माझा सखा..

माणूस आणि प्राणी यांच्यात एक नात आहे मायेचे....प्रेम दिल्याने प्रेम वाढते  हे माणसांनी सिद्ध केले आहे. आपण अनेक सण साजरे करतो आणि आनंद  वाटतो. पण त्यातील खूप सण प्राणी आणि वनस्पतींवर अवलंबून असतात. ही वेगळी आणि खूप सुंदर परंपरा आपण  जपतो. यातून निसर्गाच्या जवळ जातो आणि निसर्गाचे आपण एक घटक  आहोत ही जाणीव करून घेतो.

या भूतलावर माणूस एकटे जीवन जगू शकत नाही. त्याला सहकारी आवश्यक असतो. आपल्या मनातील बोल ऐकणारा आपला सखा तो शोधात असतो. मग कधी माणसाच्या वेगवेगळ्या नात्यामधून तर कधी प्राणी आपलेसे करून तो शोध घेतो माणसाच्या आतल्या माणसाला हे जग खूप आवडते. या जगातील प्रत्येकजण त्याला आपला वाटतो. आपले  सुखाचे आणि दुखः चे क्षण  वाटून घेण्यसाठी... पण जेव्हा माणस माणसाची साथ सोडतात...माणस माणसापासून दूर जातात ...आणि माणूस खऱ्या अर्थाने एकटा पडतो  तेव्हा माणसाला निसर्ग जवळ करतो.

झाडे, प्राणी त्याच्यावर प्रेम करतात. आणि माणसाचा एकांतवास संपवतात. त्याला जगण्याची नवी प्रेरणा देतात.. आणि जगात असताना कसं जगावं  ते शिकवतात.

आपण या जगात आलो तेव्हा पासून आपले सारे रक्षण हा निसर्ग करतो मुक्तहस्ताने .......!मग आपण आपला आनंद साजरा करतो तो ही निसर्गात..!  या विश्वात अनेक प्राणी पक्षी वृक्ष वेली आहेत पण प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे आणि म्हणून प्रत्येकाला एक जगण्याची स्वतंत्रता आहे.

आपण यांचे जगणे साजरे करतो.  आज नागपंचमी नागाची, सापांची पूजा...ज्या प्राण्याला विषारी म्हणून ओळखले जाते आणि ज्याचे अस्तित्व माणसाना सहसा सहन होत नाही त्याची देखील पूजा केली जाते. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र असणारा साप माणसांच्या गैरसमजुतीने मारला जातो.. आणि निसर्गाची एक महत्वाची अन्न साखळी आपण बंद पाडतो ही निसर्गाच्या विरुद्ध केलेली मोठी आगळीक आहे. आज आपण नागपंचमीच्या निमित्ताने साप वाचवणे आवश्यक आहे. आपल्यावर निसर्ग एवढी कृपा करत असताना आपण त्याच्या सर्व प्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे. वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे  म्हणणाऱ्या तुकोबांच्या  या भूमीत आपण निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...