*लग्नाचं वय. गैरसमज नसावा.*
सर्व मुलांनो मुलींनो व /त्यांच्या पालकांनो,
कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे १७/१८ व्या वर्षि मुलगी वयात येते.
या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात. मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात.
विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात . विचारणा होते,
पण *.
स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं. तो अचानक भाव खायला लागतो, "मुलीला अजुन शिकायचे आहे, करीयर करायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे" असे सांगुन अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात .
मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते. चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,
पण *
नुसत्या डिग्रीने काय होते, अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल, असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो. (पुर्वीच्या पिढीत म्हणजे दहा पंधरा वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या)
मग *,
मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.
बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा?
सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा, किंवा खुप खुप पगार असावा, तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा, दिसायला चांगला हवा, वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको, एकुलता एक शक्यतो नसावा, (सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत, धंदेवाईक नको, शेतकरी नको, फक्त पुणे मुंबई बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.
काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही. बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते. पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी, निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते. जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे. आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो.
****
बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते. अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार. तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.
मग *
*मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील? पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.
नंतर मग *,
*मग काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या देऊन चालल्या नोकरीवर. त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही.
खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??
म्हणुन कीं ****मुलि आणि मुलांनो
सर्व मुलींनोआणि मुंलांनो त्यांच्या पालकांनोआपल्या अपेक्षा कमी करा काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!! आणि कुणि फोन करून चौकशि केलि तर एकमेंकाना घोळवत ठेवन्यापेक्षा जे कारन असेल ते स्षष्ट सांगत चला.
संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.
*काही चुकीचे वाटल्यास क्षमा असावी.* 🙏
लेखक कोण आहे माहित नाही,
पण बरं वाटलं म्हणून तुम्हाला पाठवलं.
सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्ष्या,.....सोन्याहून मूल्यवान मनुश्यांचा साठा ज्याच्याकडे आहे....तोच खरा श्रीमंत....🙏
पहिल्यांदा तुमच्या जोडीदारानं तुमचा हात हातात घेतला, तो क्षण आठवतो? पहिल्यांदा सायकल विकत घेतली तो क्षण? तुमच्या पहिल्या अपत्याच्या येण्याची चाहूल लागली तो? बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं, त्याच्या शाळेचा पहिला गणवेश घातला, पहिली नोकरी ते प्रमोशन, मित्रांसोबत विनाकारण खळाळून हसलात, एखाद्या समारंभात नकळत तुम्ही तिच्या खांद्यावर हात ठेवलात... ते सारे क्षण आठवतात? थोडावेळ त्या आठवणींमध्ये रमून जा. कसं वाटलं? ओठांच्या कोपऱ्यावर थोडसं तरी हसू उमटलं ना? एक हलकासा रोमांचक क्षण तुम्ही आत्ताही अनुभवला असेल. नकळत कुठेतरी सुखावला असाल. हीच किमया आहे सुंदर आठवणींची; परंतु बहुतांश वेळा आपण नकारात्मक बाबींमध्ये अडकलेलो असतो. कुणी आपल्याला कसं दुखावलं, आपल्या कुठल्या इच्छा अपूर्ण राहिल्या, दुसऱ्याचं आयुष्य आपल्यापेक्षा किती चांगलं आहे, पैसे नेहमीच कमी पडतात, नवरा वेळ देत नाही, मुलं ऐकत नाहीत, दुसऱ्या मुलांसारखे मार्क आपल्या मुलांना पडत नाहीत... एक ना अनेक.
ReplyDeleteदुःख आहे ना? नक्कीच आहे; पण आपल्याला चांगले दिवस, सुंदर क्षणही मिळाले आहेत हे आपण हमखास विसरून जातो. कुणी आवर्जून विचारपूस केली, तरी आपली उत्तरे बऱ्याचदा अशी असतात, "ठीक आहे', "चाललंय आयुष्य बस्स... बाकी काय...', "जगतोय बाकी काय...'
आयुष्यातल्या सुंदर क्षणांना आपण इतक्या सहजपणे कसे विसरून जातो? त्यांचं काहीच महत्त्व नाही काय? आपण सुखाच्या गोष्टी करतो... आपल्याला दुःख असलं की हमखास आपल्याला सुख नाही म्हणून वाईट वाटतं; परंतु इतके सुंदर क्षण जे आपल्याला जगायला मिळाले, त्यांना काहीच महत्त्व नसल्यासारखे आपण वाळीत टाकतो आणि वाईट आठवणींना उगाळत राहतो, याचं आश्चर्य वाटतं.
आठवणींच्या साठ्यांमधून सुंदर, रोमांचक क्षण शोधून काढा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जितक्या वाईट आठवणी तुमच्याकडे असतील, त्यापेक्षा जास्त सुंदर आठवणी तुमच्याकडे असतील. थोडी मेहनत करावी लागेल. बालपणी शाळेतल्या बागेत खाल्लेला मित्राचा डब्बा आठवा, पहिल्यांदा कुणी आवडलं होतं तो नितांतसुंदर क्षण आठवा, अगदी एकच मिळणारा आईच्या हातच्या बेसनाच्या लाडवाचा गंध आठवा, घरात कुलर नसताना पाण्यात टाकून थंड केलेले चोखायचे आंबेही आठवा...
आयुष्याचे सौंदर्य अनुभवायला खूप पैसा किंवा प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट दर्जाचे जीवन असणे गरजेचे नाही. कालच्यापेक्षा आज आपल्याकडे सगळेच जास्त आहे, तरीसुद्धा आठवणी नेहमी वाईट अनुभवांवरच जाऊन थांबतात. आपल्याला फक्त मनाच्या या सवयींवर कडक लक्ष ठेवण्याची गरज आहे. कठीण काळ असेल, तरी वाईट अनुभव उगाळून उत्तरे सापडत नाहीत. मग कशीही वेळ असली, तरी एकमेकांसोबतचे चांगले क्षण आठवून, मन ताजेतवाने ठेऊन आयुष्याला सामोरे का जाऊ नये?